Maharashtra Havaman Andaj : गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे रब्बी हंगामातील अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला. यामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. या फटक्यातून कसेबसे पीक पूर्व पदावर येत होते.
अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने राज्याच्या हवामाना संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता तयार होत आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे नागपूर शहरात पाऊस बरसला आहे.
नागपूर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर विदर्भावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग तयार झाले आहेत. अशातच मंगळवारी किंवा त्यानंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि याचा थोडाफार प्रभाव आपल्या विदर्भावरही पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्याने विदर्भातील पूर्व भागाकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे.
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथील काही भागात अवकाळी पाऊस बरसणार आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नागपूर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची हजेरी लागणार असा अंदाज देण्यात आला आहे.
ढगाळ हवामान व अवकाळी पावसाची शक्यता आगामी एक दोन दिवस कायम राहणार आहे. यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल आणि थंडीची तीव्रता वाढणार असे बोलले जात आहे.
निश्चितच अचानक अवकाळी पाऊस बरसणार असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.