Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील नागरिकांना आगामी काही तास सावध राहावे लागणार आहे. कारण की येत्या तीन ते चार तासात महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने याबाबतची सविस्तर अपडेट दिली आहे. वास्तविक गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. ऑगस्ट महिन्यात फक्त चार ते पाच दिवस पाऊस पडला होता. शिवाय जून महिन्यातही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडलेला आहे.
फक्त जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. म्हणजेच मान्सूनच्या तीन महिन्यांपैकी फक्त एक महिना राज्यात चांगला पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात तर जुलै महिन्यातही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. यामध्ये नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आणि सटाणा तालुक्यातील काही भागांचाही समावेश होतो.
यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत होती. मात्र आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः कालपासून पावसाचा जोर वाढला आहे.
काल श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगरसमवेतच कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरिपातील पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळू लागले आहे. मात्र असे असले तरी काही भागात अजूनही पावसाला सुरुवात झालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अशातच हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने याच्या प्रभावामुळे राजधानी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या सहा जिल्ह्यात येत्या काही तासात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर संबंधित सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या भागासाठी पुढचे तीन ते चार तास अधिक महत्त्वाचे राहणार अशी माहिती यावेळी हवामान विभागाने दिली आहे. या संबंधित जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे.