Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ही अपडेट आहे पावसासंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सकाळच्या तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
पण कमाल तापमान अजूनही सरासरी एवढेच आहे. मात्र आता येत्या काही दिवसात राज्यातील कमाल तापमानातही घट होणार आहे. यामुळे साहजिकच थंडीची तीव्रता वाढणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, पुढील महिन्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो.
थंडीचा जोर खऱ्या अर्थाने दिवाळीनंतरच वाढणार आहे. 15 नोव्हेंबर नंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज काही हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. पण गेल्या काही दिवसात सकाळच्या तापमानात घट झाली असल्याने वातावरणात थोडासा गारवा तयार झाला आहे. मात्र अजूनही कमाल तापमान कमी झालेले नाही. याचा परिणाम म्हणून अजूनही काही ठिकाणी ऑक्टोबर हिट चा प्रकोप पाहायला मिळत आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार राज्यात दिवाळीच्या काळात पुन्हा एकदा पावसाची शक्यता तयार होणार आहे.
आय एम डी ने दिवाळीच्या कालावधीमध्ये म्हणजेच ऐन हिवाळ्यात अरबी समुद्रात किंवा बंगालच्या खाडीत एका चक्रीवादळाची निर्मिती होईल आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होईल असा अंदाज वर्तवला आहे. दिवाळीच्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केव्हा तयार होणार चक्रीवादळ ?
IMD ने सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. हे कमी दाब क्षेत्र पुढे जाऊन चक्रीवादळात परावर्तित होणार आहे.
मग या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होईल असा अंदाज आहे. खरंतर अरबी समुद्रात नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. याला तेज असे नाव भारताकडून देण्यात आले होते. पण या चक्रीवादळाची दिशा बदलल्यामुळे याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळाला नाही.
या चक्रीवादळाचा गुजरात राज्यावरही परिणाम झाला नाही. मात्र आता दिवाळीच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा मग अरबी समुद्रात एका चक्रीवादळाची निर्मिती होईल आणि या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल असा नवीन अंदाज समोर आला आहे.
त्यामुळे आता हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. दरम्यान रब्बी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकरी बांधवांची हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरावा आणि अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस बरसावा अशी इच्छा आहे.