हामुनचे महाचक्रीवादळात रूपांतर..! आज ‘या’ भागात होणार अतिवृष्टी, हवामान खात्याचा गंभीर इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : मानसूनने महाराष्ट्रासह देशातून एक्झिट घेतल्यानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनता परेशान होती. किंबहुना अजूनही राज्यातील काही भागात ऑक्टोबर हिटचा प्रभाव पाहायला मिळत आहे.

वाढलेल्या तापमानामुळे नागरिक बेजार झाले आहेत. पण गेल्या दोन दिवसांच्या हवामानाचा विचार केला असता राज्यातील तापमानात जवळपास एक ते दोन अंश सेल्सिअस पर्यंतची कपात झाली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील जनतेला उष्णतेपासून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे.

तसेच काही भागात सकाळी थंडीला देखील सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सकाळी-सकाळी पारा खूपच खाली जात आहे. यामुळे तेथे बोचरी थंडीचा अनुभव आता नागरिकांना येऊ लागला आहे. आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. अशातच मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आता महाचक्रीवादळात परावर्तित झाले आहे.

हामून चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केले आहे. यामुळे हे चक्रीवादळ धोकेदायक बनत चालले आहे. याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील पाच राज्यांमध्ये हामुन चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होणार आहे. IMD म्हणतंय की, आगामी 12 तास देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या पुढील बारा तासांमध्ये देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यात त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम राज्याचा समावेश होतो. या राज्यांमध्ये आज अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान आज या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून आज हे वादळ बऱ्यापैकी कमकुवत होईल असेही हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. IMD ने जारी केलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात आज ईशान्य भारत, गंगेचा पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस हजेरी लावणार असे सांगितले आहे.

तसेच आज केरळमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडणार असे IMD ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान आपल्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढेल असे चित्र तयार होत आहे.

Leave a Comment