Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अखेर केव्हा विश्रांती घेणार हा सवाल राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काल, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनचे ढग जमा झाले होते.
नागपूरसहित विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले तर काही ठिकाणी वादळी पाऊसही झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही काल ढगाळ हवामान तयार झाले होते.
तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक भागात काल वादळी पाऊस झाला आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीसाठी तयार झालेल्या शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द
रम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे.
एवढेच नाही तर विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट होणार असाही अंदाज यावेळी हवामान खात्याने जारी केला आहे. यामुळे महाराष्ट्रात आणखी किती दिवस वादळी पाऊस सुरू राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
याबाबत हवामान विभागाने सुद्धा मोठी माहिती दिली आहे. आय एम डी च्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 24 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे.
म्हणजे उद्यापर्यंत वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. पुढील दोन दिवस विजा व ढगांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. पण, तदनंतर वादळी पावसाचा जोर ओसरणार असे म्हटले जात आहे.
25 एप्रिल पासून पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज असला तरी देखील 28 एप्रिल 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते असे वेधशाळेच्या माध्यमातून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.