Maharashtra Havaman Andaj : कालपासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा एक नवीन चेंज पाहायला मिळाला आहे. खरंतर, गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील झाला.
एवढेच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी देखील लागली आहे. आता मात्र पुन्हा एकदा राज्यातील कमाल तापमानात वाढ होत आहे. कालपासून राज्यातील तापमानात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील नागरिक पुन्हा उकाड्याने हैराण होत आहेत.
आता पुन्हा एकदा उन्हाचे चटके वाढले आहेत. यामुळे ऑक्टोबर हीट नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. अंगाची अक्षरशः लाही-लाही होत आहे. दरम्यान उकाडा वाढला असल्याने आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार का? हा सवाल शेतकऱ्यांकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे कालपासून म्हणजे 18 ऑक्टोबरपासून राज्यातील ढगाळ वातावरण निवळण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता ऑक्टोबर हिट पुन्हा एकदा जाणवणार आहे.
विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात अधिक जाणवणार असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच यंदा या चालू ऑक्टोबर महिन्यात अधिकचे तापमान सहन करावे लागणार आहे. तसेच आता राज्यात पावसाची शक्यता खूपच कमी असल्याचे खुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
म्हणजेच या चालू महिन्यात आता महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आगामी काही दिवस दुपारचे कमाल तापमान 2 अंश सेल्सिअस आणि पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअस जास्त राहणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र तापमानात वाढ होणार आहे. मात्र, कोकणात आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटची तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
एकंदरीत आता पुन्हा एकदा राज्यावर ऑक्टोबर हिटचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. तसेच आता महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान तज्ञांनी स्पष्ट केले आहे.