Maharashtra Monsoon News : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ भारतात मान्सूनचा काळ असतो. या कालावधीमधील नैऋत्य मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतो. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे.
यामुळे जर मान्सून कमकुवत झाला तर याचा अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान, अनेक जागतिक हवामान संस्थांनी यंदा अर्थातच 2024 मध्ये चांगला समाधानकारक पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे.
एल निनोचा प्रभाव हळूहळू कमी होत असून मान्सून काळामध्ये याचा प्रभाव नाहीसा होईल आणि ला निना साठी परिस्थिती पोषक होईल असा अंदाज आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील असाच अंदाज दिला आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी आशिया – पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या हवामान केंद्राने भारताच्या मान्सून बाबतचा आपला पहिला अंदाज व्यक्त केला. यामध्ये या संस्थेने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात भारतात सामान्य पेक्षा अधिक पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
अर्थातच यंदाचा पावसाळा हा चांगला होणार असे या संस्थेने म्हटले आहे. मान्सून 2024 मध्ये एल निनो दिसणार नाही. याउलट ला-निनाची स्थिती तयार होणार अन म्हणूनच यंदा भारतात मान्सून चांगला असेल. मान्सून काळात चांगला पाऊस बरसणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात महाराष्ट्राचे देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे.
दरम्यान, 2024 मध्ये पुन्हा एकदा दुष्काळ पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान संशोधक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जोहरे यांनी विजा आपले रंग बदलत आहेत.
विजेचा निळसरपणा कमी होत असून त्या लाल बनत आहेत. विशेष बाब अशी की, विजांचा हा रंग फक्त आपल्या भारतातच बदलत असतांना दिसत आहे. परिणामी, ही कोरड्या दुष्काळाची चाहूल असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
पण हे एक प्राथमिक संशोधन निष्कर्ष आहे. यामुळे सर्वत्र या प्राथमिक संशोधन निष्कर्षाची चर्चा पाहायला मिळत आहे. निश्चितच, 2023 प्रमाणे 2024 मध्ये देखील दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळाली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तथापि, एप्रिल महिन्यात मान्सून संदर्भातील भारतीय हवामान खात्याचा सविस्तर अंदाज समोर येणार आहे अन तेव्हाच आगामी मान्सून कसा राहणार याविषयी योग्य तो निष्कर्ष काढता येईल.