Maharashtra News : आपल्याकडे अन्न हे परब्रम्ह ! असं म्हटलं जात. अर्थातच भारतीय संस्कृतीत अन्नाला ब्रह्माचा दर्जा आहे. विशेष म्हणजे मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्नाचा समावेश आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत.
आणि याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. या तीन गरजांच्या पूर्ततेसाठी अनेकजन मेहनतीचे काम करत असतात. दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून अशाच मेहनतीच्या काम करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी कौतुकास्पद योजना सुरू करण्यात आली आहे.
वास्तविक, राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच वंचित घटकांचा उद्धार व्हावा म्हणून नेहमीच नवनवीन अभिनव उपक्रम आणि योजना सुरू केल्या जातात. यामध्ये राज्य शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे.
सरकारने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज आपण ही योजना काय आहे आणि या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो या संदर्भात थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे ही योजना?
राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण मोफत पुरवले जात आहे. यासाठी मात्र बांधकाम कामगार नोंदणीकृत असणे ही अट आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी दुपारचे मोफत जेवण नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुरवले जात आहे.
योजनेचा लाभ कुणाला?
ही योजना कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे अर्थातच नोंदणीकृत बांधकाम आहेत अशांना दुपारचे जेवण मोफत दिले जात आहे. कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हे मोफत जेवण पुरवले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 32000 कामगारांना मिळतोय लाभ
अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 90 हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३२,७०५ कामगार सक्रिय आहेत. या सर्व सक्रिय कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी शासनाकडून मोफत मध्यान्न भोजनाची व्यवस्था करून दिली जात आहे.
कामगारांची नोंदणी कशी होते
बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. यासाठी एक रुपया शुल्क कामगारांकडून आकारला जातो. संपूर्ण राज्यभरातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.