निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयामुळे कांदा दरात मोठी घसरण ! पण महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 4 हजाराचा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Onion Rate Hike : केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कांदा निर्यात निशुल्क केली जात होती. परंतु आता 40% शुल्क लागणार आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वत्र शासनाच्या या निर्णया विरोधात आवाज बुलंद करण्यात आला आहे. शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी शासनाच्या या निर्णया विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक भागात शेतकऱ्यांनी लिलाव देखील बंद पाडले आहेत. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन बॅकफूटवर आले. परिणामी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे या मुद्द्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. निर्यात शुल्क केंद्र शासनाने मागे घ्यावे अशी मागणी राज्य शासनाने केली.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी दिल्लीवारी देखील केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर जपानमधून केंद्रीय स्तरावरील नेत्यांसोबत चर्चा केली होती. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय स्तरावरील नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतर शासनाने निर्यात शुल्क मागे घेण्याचा निर्णय तर घेतला नाही मात्र नाफेड कडून दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचा मोठा निर्णय घेतला.

परंतु हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार नाही असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सध्या देशभरातील शेतकऱ्यांकडे चाळीस लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. अशा स्थितीत केवळ दोन लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी केली तर उर्वरित 38 लाख मेट्रिक टन कांद्याचे काय होणार, त्याला कसा भाव मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान शासनाने घेतलेल्या 40% निर्यात शुल्क लागू करण्याच्या तुघलकी निर्णयामुळे कांदा दरात घसरण होऊ लागली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला मात्र ₹1200 प्रतिक्विंटल ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळत आहे. काही ठिकाणी सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद केले जात आहेत. एकंदरीत 2500 रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले सरासरी बाजार भाव कमी झाले आहेत.

अशातच मात्र राज्यातील एका बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कालच्या लिलावात कांद्याला तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल झालेल्या लिलावात अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 309 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली होती.

कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200 रुपये प्रति क्विंटल कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला होता. मात्र राज्यातील उर्वरित बाजारात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये यामुळे कांदा उत्पादक पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 

Leave a Comment