Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षापासून सातत्याने नानाविध अशा नैसर्गिक संकटांमुळे भरडला जात आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपिट आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
जर समजा शेतीमधून समाधानकारक उत्पादन मिळाले तर शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांदा या नगदी पिकाबाबत असेच सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या चालू वर्षातही फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळाला.
शेतकऱ्यांना अवघा पाच ते सहा रुपये प्रति किलो या दरात कांदा विक्री करावा लागला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना पिकासाठी केलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. यामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शासनाच्या अनैतिक धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले असून कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान आता जुलै महिन्यात कांदा बाजारात तेजी आली आहे.
या चालू महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच कांदा बाजारभावात वाढ पाहायला मिळत आहे. आजही राज्यात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज राज्यात कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव?
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 258 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 3 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल, 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान आणि 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज पांढऱ्या कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल कमाल, दोन हजार रुपये प्रति क्विंटल किमान आणि 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला 2555 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल, 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान आणि 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.