पंजाबराव यांचा तातडीचा मॅसेज ; वातावरणात अचानक झाला मोठा बदल, आजपासून ‘या’ भागात सुरु होणार पाऊस!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलै महिन्यात सुरुवातीला जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने 14 जुलै पासून ते 17 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे 17 जुलै ते 19 जुलै या कालावधीत राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आयएमडीने व्यक्त केली आहे. जवळपास 24 जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे.

अशातच शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मेसेज जारी केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून अर्थातच 12 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.

राज्यात 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात रोजाना भाग बदलत पाऊस पडणार आहे. या कालावधीत पडणारा पाऊस मात्र सर्वदूर राहणार नाही. परंतु ज्या भागात अजूनही पाऊस झालेला नाही त्या भागात समाधानकारक पाऊस या कालावधीमध्ये पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

12, 13, 14 आणि 15 जुलैला दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. या चार दिवसात राज्यात दररोज भाग बदलत ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. या कालावधीत मात्र सर्वदूर पाऊस पडणार नसून विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल अस त्यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान ज्या भागात पाऊस चांगला झाला आहे तिथे पेरण्या झाल्या आहेत परंतु जिथे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही तेथे पेरण्या बाकी आहेत. मात्र आता 15 जुलै पर्यंत पडणाऱ्या या पावसात बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार आहेत. यानंतर 18 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असून 18 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही होणार जोरदार पाऊस !

पंजाबराव डख यांनी यावर्षी 22 दिवस पावसाळा पुढे सरकला असल्याचा दावा केला आहे. तसेच यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी बांधला आहे.

आज बारा जुलै ते 14 जुलै दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस होणार आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस होईल असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Leave a Comment