Maharashtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या, लोकसभा निवडणुका, लगीन सराई आणि सणासुदीचा हंगाम यामुळे सर्वत्र मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या गावी परतत आहेत. काहीजण सहलीसाठी बाहेर निघत आहेत. आपल्या परिवारासमवेत तथा मित्रांसमवेत पर्यटकांची पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होत आहे.
यामुळे सध्या विविध रेल्वे मार्गांवर धावत असलेल्या गाड्या हाऊसफुल होत आहेत. अनेकांना गावी जाण्यासाठी तिकीट मिळत नसल्याची वास्तविकता आहे. यामध्ये कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागतोय.
दरम्यान, कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पनवेल ते मडगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे कोकणातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार, ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मडगाव-पनवेल उन्हाळी विशेष रेल्वे गाडी (गाडी क्रमांक ०११५८) ६ मे ला सकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचणार आहे.
तसेच पनवेल – मडगाव समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक ०११५७) ही ट्रेन 8 मे 2024 ला पनवेल रेल्वे स्थानकावरून पहाटे चार वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार पनवेल ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही गाडी या मार्गावरील करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार असल्याची माहिती समोर येत आहे.
म्हणजे कोकणातील जवळपास 18 रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच कोकणातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.