Maharashtra Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गृहिणींसाठी अधिक खास राहणार आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. दैनंदिन कामानिमित्त कामगार वर्ग मुंबई, पुण्यासारख्या शहरात रेल्वेने, लोकलने प्रवास करतात.
जर तुम्हीही कधी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गेलात तर तुम्हाला प्रवाशी कामावरून परतताना भाजीपाला घेऊन जाताना, किराणा घेऊन जाताना किंवा इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाताना दिसत असतील.
म्हणजेच आता अनेकांकडे या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी देखील वेळ राहिलेला नाही. कित्येकदा तर महिलांना रेल्वेमध्येच भाजीपाला निवडताना अथवा भाजी खुडताना पाहिले जाते.
त्यामुळे आता अशा या व्यस्त वेळापत्रक असलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच स्वस्तात तांदूळ आणि गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेला रेल्वे मंत्रालयाची तथा रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली असल्याची बातमी देखील समोर आली आहे. म्हणजेच आता लवकरच रेल्वे स्थानकांवर पिठासह तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
रेल्वेने केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या मदतीने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील काही निवडक रेल्वे स्थानकावर या योजनेअंतर्गत स्वस्तात तांदूळ आणि पीठ उपलब्ध करून दिले जाईल आणि मग पुढे टप्प्याटप्प्याने या योजनेला विस्तारले जाईल असे म्हटले जात आहे.
रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिले जाणारे तांदूळ आणि पीठ भारत ब्रँडचे राहणार आहेत. म्हणजेच केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या भारत ब्रँडचे तांदूळ आणि गव्हाचे पीठ आता रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत ब्रँडचे तांदूळ 29 रुपये किलो या दराने उपलब्ध होतात आणि भारत ब्रँडचा आटा 27.50 प्रति किलो या दरात विकले जात आहे. दरम्यान याच भारत ब्रँडचे तांदूळ आणि पीठ आता रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रवाशांनी जर चांगला प्रतिसाद दिला तर पुढे ही योजना कंटिन्यू केली जाईल.
यासाठी ज्या रेल्वे स्थानकांची निवड होईल त्या रेल्वेस्थानकांवर तांदूळ तथा पिठाच्या बॅगेची भरलेली वॅन स्थानकाबाहेर सायंकाळी उभी केली जाईल आणि याची विक्री होईल अशी माहिती समोर आली आहे. निश्चितच रेल्वे बोर्डाचा हा निर्णय प्रवाशांसाठी खूपच फायद्याचा ठरणार असून यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.