Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाने 25, 26, 27, 28 नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असाही अंदाज हवामान खात्याने दिला होता.
दरम्यान हवामा खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. 25 तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
सव्वीस तारखेला तर नाशिक जिल्ह्यात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 28 नोव्हेंबरला देखील राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
कुठे पडणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, आज अर्थातच 28 नोव्हेंबर 2023 रोजी विदर्भातील 11 जिल्ह्यात अर्थातच अमरावती विभागातील आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोबतच आज उत्तर कोकणातील पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता कायम आहे.
हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावतीसह संपूर्ण 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
पण उद्यापासून अर्थातच 29 नोव्हेंबर पासून अवकाळी पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे. उद्यापासून पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.