Maharashtra Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवले आहे.
यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व आजूबाजूच्या परिसरातील काही गावांमध्ये गारपीटीची हजेरी लागली आहे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतकऱ्यांचे शेतीपिक त्यांच्या डोळ्यादेखत वाया गेले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी किती दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट असेच कायम राहू शकते याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज 29 फेब्रुवारीला मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांना अर्थातच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि नवी मुंबई येथे आज पावसाची शक्यता आहे.
येथे आज ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा व किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे. पण कोकणातील कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार नाही असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.
तसेच, एक मार्च पर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे उद्या या संबंधित जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते असे देखील आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच येथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात दोन मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उद्या मराठवाड्यात गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय भारतीय हवामान खात्याने विदर्भात देखील दोन मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
एकंदरीत दोन मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तथापि दोन मार्च नंतर अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे निवळणार का याबाबत अजूनही हवामान खात्याच्या माध्यमातून माहिती समोर आलेली नाही.