Maharashtra Rain : राज्यातील हवामानात कालपासून थोडासा चेंज पाहायला मिळत आहे. आता राज्यात अवकाळी पावसाचे थैमान थांबल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.
गेल्या महिन्यात सुरू झालेला हा अवकाळी भाग बदलत धुमाकूळ घालत होता. गेल्या महिन्यात तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर कमी झाला.
या चालू महिन्यात फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरु होता. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. आता मात्र राज्यातील हवामान कोरडे झाले आहे.
काही भागात अंशतः ढगाळ हवामान आहे. मात्र बहुतांशी भागात स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी थंडीची देखील चाहूल लागली आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
अवकाळी पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी देखील येत्या काही दिवसात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे आता अवकाळी पावसाचे प्रमाण कमी राहील पण राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार आहे. याशिवाय राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढेल अशी शक्यता आहे. तसेच राज्यातील बहुतांशी भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असे सांगितले आहे.
आय एम डी ने पावसाचा इशारा जारी केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. शिवाय थंडीचा जोर वाढणार असल्याने रब्बी हंगामासाठी हे वातावरण पोषक राहणार आहे.
मात्र असे असले तरी राज्यात 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पाऊस करायचं याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ञांनी दिला आहे. या कालावधीत राज्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
एकंदरीत येत्या काही दिवसानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग गर्दी करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभूती पुन्हा एकदा घेता येणार आहे.