ब्रेकिंग ! ‘या’ तारखेला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज आला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : सध्या शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पुढे सरसावले आहेत. शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत अगदी घरातील लहानग्या सदस्यांसोबत शेतशिवारात पेरणीसाठी राबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेती शिवारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

दरम्यान राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा चेंज पाहायला मिळाला आहे. आता राज्यातील हवामानात बदल झाला असून सकाळच्या तापमानात घट आली आहे. यामुळे सकाळी-सकाळी थंडी जाणवू लागली आहे. मात्र दुपारच्या कमाल तापमानात अजूनही घट आलेली नाही.

यामुळे दुपारी उन्हाचे चांगले चटके बसतात. एकीकडे सकाळी थंडी वाजत आहे तर दुसरीकडे दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत यामुळे राज्यात सध्या समिश्र वातावरणाचे अनुभूती येत आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामासाठी शेतशिवारात राबणाऱ्या बळीराजाला आता रब्बी पिकांसाठी पावसाची गरज भासू लागली आहे.

यंदा मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस बरसलेला नसल्याने शिवाय परतीचा पाऊस देखील राज्यात मनसोक्त बरसला नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पावसाची गरज आहे. यामुळे शेतकरी बांधव आता अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस पडावा असे मत व्यक्त करत असून अगदी चातकाप्रमाणे अवकाळी पावसाची वाट पाहिली जात आहे. खरंतर अवकाळी पाऊस हा शेती पिकांसाठी घातकच ठरतो.

पण यंदा मान्सून काळात फारसा पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यावर्षी मान्सूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता अवकाळी पाऊस का होईना पाऊस बरसला पाहिजे असे मत व्यक्त होत आहे. अशातच पावसाबाबत हवामान खात्याच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक एक बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र उद्यापासून राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या आणि परवा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे.

याशिवाय सिंधुदुर्गात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याचे देखील शक्यता आहे. याशिवाय उद्या सोमवारी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग मध्ये 31 ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या आणि परवा येलो अलर्ट जारी झाला आहे. मंगळवारी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे बारीक लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment