मोठी बातमी ! पुढील चार-पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस पडणार, तुमच्या भागात कस राहणार हवामान ? IMDचा अंदाज पहा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगल पर्जन्यमान झालं तर शेतीमधून चांगले समाधानकारक उत्पादन मिळते आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होते.

यंदा मात्र मान्सून बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीपासूनच यंदा मान्सून कमकुवत राहणार असे सांगितले जात आहे. यानुसार मान्सूनचा पहिला दीड महिन्यांच्या काळात राज्यात कुठेच समाधानकारक पाऊस झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्वरित राज्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे. राज्यात जवळपास 70 ते 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र अजूनही काही भागात पेरण्या बाकी आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवण्याची शक्यता आहे.

अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आगामी चार ते पाच दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. निश्चितच पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला तर पेरणी झालेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

यामुळे धरण क्षत्रात पाण्याची पातळी वाढणार आहे, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत देखील यामुळे वाढ होईल आणि सहाजिकच खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे. विशेष म्हणजे पावसाच्या या पाण्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जोरदार वाढीसाठी पोषक हवामान तयार होणार आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी चार ते पाच दिवस कोकणासह मध्य भारतातील काही भागात पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता आहे. 19 ते 20 जुलै दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.

18 जुलैला बंगालच्या उपसागरात एक प्रणाली विकसित होत आहे ज्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

खरंतर मराठवाड्यात आत्तापर्यंत मुसळधार पावसाचा इशाराच मिळालेला नव्हता. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जर मराठवाड्यात चांगला पाऊस झाला तर तेथील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

IMD ने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, आज 17 जुलैला पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या 18 जुलैला रायगड, पुणे आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. तसेच 19 आणि 20 जुलैला पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Leave a Comment