वरूणराजाचा सांगावा आला रे…! ‘या’ तारखेनंतर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार, ‘त्या’ 6 जिल्ह्यात पडणार जास्तीचा पाऊस, जेष्ठ हवामान तज्ञ होसाळीकर यांची माहिती 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain News : सध्या शेतकऱ्यांपुढे एक ना अनेक संकटे उभी आहेत. एकतर यावर्षी मान्सून उशिराने आला यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी लांबली. जेमतेम पेरणी एवढा पाऊस झाला, शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केली आणि आता भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे ज्या भागात समाधानकारक पाऊस पडलेला नव्हता तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

परंतु ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तेथील शेती पिके वाया गेलीत. वास्तविक, गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यामुळे ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस होईल आणि खरीप हंगामातील पिकांची चांगली वाढ होईल, चांगले उत्पादन मिळेल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना वाटत होती.

मात्र शेतकऱ्यांनी तसा विचार केला तसं काही झालं नाही. आता गेल्या 14-15 दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातुन पाऊस गायब झाला आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला राज्यातील अनेक जिल्ह्यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. अनेक भागात भर पावसात तिरंगा फडकला होता. यंदा मात्र 15 ऑगस्ट ला पाऊस पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात आता चार ते पाच दिवसात हवामानात बदल होईल आणि त्यानंतरच पावसाला सुरुवात होईल असे मत हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे ज्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली आहे. पण चार दिवसानंतर का होईना जर चांगला पाऊस पडला तर खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळेल असे सांगितले जात आहे. दरम्यान हवामान खात्याचे पुणे विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

कृष्णानंद यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे शेवटच्या आठवड्यात कोकणातही पाऊस पडेल असं त्यांनी नमूद केलं. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा कमी पाऊस होणार असा अंदाज आहे.

त्यांनी सांगितले की 21 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता आहे. 

Leave a Comment