Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
राज्यातील विदर्भ विभागातील अकोला शहरात कमाल तापमान 42.8°c पर्यंत पोहोचले आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये कमाल तापमान 41 पर्यंत पोहोचले आहे.
यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहे. अशातच मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट तयार झाले आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात तीन दिवस पावसाचे राहणार आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात आज पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रात मालेगाव मध्ये सकाळी 10 च्या सुमारास अवकाळी पावसाने दस्तक दिली. पावसाचा जोर कमी होता मात्र रखरखत्या उन्हात आलेल्या पावसामुळे नागरिकांना चांगला गारवा अनुभव व्हायला मिळाला.
मालेगावातील ग्रामीण भागात मात्र फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळाले. दुसरीकडे आयएमडीने आजपासून 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे.
या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज यावेळी हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे परंतु पावसातही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे.
IMD ने म्हटल्याप्रमाणे, राज्यातील कोकण विभागात 29 व 30 मार्च रोजी अवकाळी पावसाची शक्यता काय राहणार आहे. खान्देश सहित मध्य महाराष्ट्र विभागात 29 व 30 मार्च रोजी हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्यवण्यात आली आहे.
मराठवाडा विभागात 29 व 30 मार्चला हलका व मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भ विभागात 29 ते 31 मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.