Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. राज्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.
आगामी काही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहील तर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 23 नोव्हेंबर पासून ते 26 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे या कालावधीत पावसाचा अंदाज घेऊनच सर्वसामान्यांना घराबाहेर पडावे लागणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे.
कोणत्या भागात बरसणार अवकाळी
23 नोव्हेंबर 2023 : गुरुवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र 23 तारखेला हवामान प्रामुख्याने कोरडे राहील अशी माहिती आयएमडीने दिली आहे.
24 नोव्हेंबर 2023 : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 24 तारखेला पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी या संबंधित भागांमध्ये मेघगर्जेनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
25 नोव्हेंबर 2023 : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 25 तारखेला राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
26 नोव्हेंबर 2023 : 26 तारखेला राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तवला आहे.
एकंदरीत, राज्यात 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीत विशेष सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.