शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, काही भागात अतिवृष्टी देखील होणार, हवामान विभागाचा अंदाज वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update : राज्यात जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केला. जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला नाही. मान्सूनचा पहिला महिना कोरडा गेला. यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी लागली.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पण जुलै महिन्यात झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पेरणी झाली नाही. काही भागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पाऊस देखील झाला नाही. आता जुलै महिना सुरू होऊन जवळपास दोन आठवडे उलटले आहेत.

अजूनही राज्यातील काही भागात पेरणी झालेली नाही. मराठवाडा आणि विदर्भात पेरणीचे प्रमाण सर्वात कमी आहे. नासिक, अहमदनगरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही अपेक्षित प्रमाणात पेरणीची कामे झालेली नाहीत.

यामुळे शेतकरी चिंतातूर असून यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे. यंदा दुष्काळ पडणार म्हणून बळीराजा चिंताग्रस्त आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.खरंतर महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये मात्र देशातील इतर राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

देशातील जवळपास आठ राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आसाम राज्यातील सहा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे 22,000 लोकांना फटका बसला आहे. देशातील हिमालयापासून ते मध्य प्रदेशपर्यंत जोरदार पाऊस होत आहे.

अतिवृष्टीमुळे आणि जास्तीच्या पावसामुळे या संबंधित भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आता हा मान्सून ट्रफ आपल्या राज्याकडे येणार आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेला हा मान्सून ट्रफ आता महाराष्ट्राकडे सरकणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात हा मान्सून ट्रफ महाराष्ट्रात दाखल होण्यास पोषक हवामान तयार होत आहे.

याचा परिणाम म्हणून 14 जुलै ते 17 जुलै या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. विशेष बाब अशी की 17 जुलै नंतर राज्यात अतिवृष्टी होणार आहे.

17 ते 19 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जवळपास 24 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

Leave a Comment