राज्यात पुढील दहा दिवस कसे राहणार हवामान ? पावसाचा जोर केव्हा वाढणार ? हवामान विभागाचा नवीन अंदाज वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात एकदाही चांगला मोठा पाऊस पडला नाही. यामुळे खरिपातील पिके संकटात आली होती. सोयाबीन, कापूस, मका, तूर इत्यादी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

अनेक भागातील पिके करपली होती. यामुळे सगळीकडे यंदा भीषण दुष्काळ पडणार अशाच चर्चा होत्या. शासनाने देखील या अनुषंगाने पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली होती. पण सप्टेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी खूपच चांगली राहिली. या चालू महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाचे जोरदार आगमन झाले.

सात सप्टेंबर पासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात आणि काही भागात 10 सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे खरिपातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाल. खरिपातील पिके आता उभारी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे जर सप्टेंबर मध्ये पाऊस झाला नसता तर महाराष्ट्रावर पिण्याच्या पाण्याचे देखील संकट उभे राहणार होते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला देखील या पावसाने दिलासा देण्याचेच काम केले आहे अस आपण म्हणू शकतो. मात्र 10 सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांशी भागातील पाऊस गायब झाला आहे.

सध्या कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे, राज्यातील उर्वरित भागातून पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात आले आहेत. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.

तसेच पुढील दहा दिवसांपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज पासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 13 सप्टेंबर 2023 पासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे.

या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच उद्यापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात होणार आहे. 14 सप्टेंबर पासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, जळगाव, धुळे येथेही पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेले कपिदाभाचे क्षेत्र आज तीव्र होणार आहे. तसेच भारतीय मान्सून साठी आवश्यक असलेले इंडियन ओशियन डायपोल म्हणजेच आयओडी आता सकारात्मक होत आहे. यामुळे आता पावसाचा जोर वाढणार असे सांगितले जात आहे. 16 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

16 ते 19 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच ही प्रणाली वायव्येकडे सरकल्यावर त्याचा कोकणातही प्रभाव जाणवणार आहे. या प्रणालीमुळे कोकणात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे जर ही प्रणाली वायव्यकडे सरकले तर शनिवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण उत्तर कोकणात 16 सप्टेंबर पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचीच शक्यता आहे. एकंदरीत राज्यात आज पासून पाऊस सुरु होणार आहे.

पावसाची तीव्रता सोळा सप्टेंबर पासून वाढणार आहे. 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 24 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे.

यामुळे जर आगामी दहा दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला तर ऑगस्ट महिन्यात पावसाची निर्माण झालेली तूट या चालू महिन्यातून भरून निघेल असे मत आता व्यक्त होऊ लागले आहे.

Leave a Comment