Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 12 ते 13 दिवसांपासून रजेवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. खरंतर, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पाऊस झाला. या जास्तीच्या पावसाने निश्चितच राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि तेथील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
याव्यतिरिक्त पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात सामान्य जनजीवन देखील बाधित झाले आणि शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, जोरदार पावसामुळे काही भागातील पिकांना जीवनदान देखील मिळाले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपासून पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पण आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकताच व्यक्त करण्यात आला आहे. पाऊस पुन्हा एकदा बरसण्याच्या मूडमध्ये असल्याचे चित्र आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी महत्त्वाचे अपडेट दिली आहे. कृष्णानंद यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या चार ते पाच दिवसात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने सोमवारी हलक्या सरी बरसल्या. तसेच पुढील 24 तासात राजधानी मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज कृष्णानंद यांनी यावेळी व्यक्त केला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार असल्याने शेतकऱ्यांची चेहरे फुलले आहेत. पण असे असले तरी शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची आशा आहे.
खरंतर गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला मात्र अजूनही राज्यात असे काही भाग आहेत जिथे समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत तेथील शेतकऱ्यांची चिंता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने ओढ दिली असल्याने आणखी वाढली आहे. पण आता पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात दाखल होणार असे मत हवामान विभागाचे अतिरिक्त संचालक कृष्णानंद यांनी व्यक्त केले आहे.