मान्सूनचा शेवट होणार जोरदार पावसाने ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधारा, तुमच्या भागात कस राहणार हवामान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेला सप्टेंबर महिना पावसाने मोठा गाजवला. गेल्या महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. खरंतर ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला.

यामुळे राज्यातील विविध भागातील शेती पिके करपली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आणि यामुळे गेल्या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात 25 सप्टेंबर नंतर देशातून मान्सूनने माघारी फिरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागातून मान्सून आता माघारी फिरला आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही मान्सून सक्रिय असून आगामी काही तासात राज्यातील विविध भागात मोसमीं पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तवला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचा शेवट देखील जोरदार पावसानेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान खात्याने आगामी 48 तासात राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच या संबंधित भागांमधील शेतकरी बांधवांना काढणीसाठी आलेल्या शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे मुंबईसह कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि पुणे या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला केव्हा सुरुवात होणार?

राज्यातून अजून मान्सूनने माघारी फिरण्यास सुरुवात केलेली नाही. मात्र 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल परिस्थिती आहे. हवामान खात्याने 10 ऑक्टोबर नंतर राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज यावेळी वर्तवला आहे. तत्पूर्वी मात्र येत्या 48 तासात राज्यातील काही भागांमध्ये मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment