देशभरातील बँक कर्मचारी एकाच वेळी जाणार संपावर ! केव्हा सुरू होणार देशव्यापी संप, कारण काय? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशभरातील बँक कर्मचारी एकाच वेळी संपाच हत्यार उपसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.

खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः जेव्हापासून केंद्र शासनाने जनधन खाते योजना राबवली आहे तेव्हापासून खातेधारकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहारावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत.

आता कॅशने व्यवहार करणे ऐवजी यूपीआय पेमेंट, चेक तसेच इंटरनेट बँकिंग यांसारख्या साधनांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जात आहेत. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित होत आहेत. मात्र यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे.

शिवाय निवृत्ती पदोन्नती मृत्यू यामुळे देशभरातील बँकांमधील मनुष्यबळ सातत्याने कमी होत आहे. एकीकडे बँकांमधील मनुष्यबळ कमी होत आहे तर दुसरीकडे सरकारकडून बँकेतील कर्मचाऱ्यांची नवीन भरती देखील केली जात नाहीये. तसेच जर भरती केली तर ती भरतीही पुरेशा प्रमाणात केली जात नाही.

अशा स्थितीत बँकेतील कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान आता या विरोधात बँकेतील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. बँक कर्मचारी, अधिकारी संघटना आता बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदभरती करून बँकेतील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करावा या मुख्य मागणीसाठी संपावर जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकांमध्ये पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि नियमित नोकऱ्यांच्या आउटसोर्सिंगला विरोध म्हणून बँक युनियन संपावर जाणार आहे.

देशातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुख संस्थेने हा संप पुकारला आहे. याचा परिणाम म्हणून एकूण १३ दिवस देशातील बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने 4 डिसेंबर 2023 पासून संप पुकारला असून हा संप 20 जानेवारी 2024 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे.

4 डिसेंबरला स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सिंध बँक, 5 डिसेंबरला बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया, 6 डिसेंबरला कॅनरा बँक आणि युको बँक, 7 डिसेंबरला इंडियन बँक आणि युको बँक, ८ डिसेंबरला युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

तसेच सदर वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2023 ला खासगी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. तसेच नवीन वर्षांमध्ये बँकेतील कर्मचारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच वेळी टप्प्याटप्प्याने संप पुकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

यानुसार नवीन वर्षात 3 जानेवारी 2024 रोजी पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण, दीव या राज्यांमधील सर्व बँकेतील कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निश्चितच बँकेतील कर्मचाऱ्यांचा हा संप सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागेल असे मत व्यक्त होत आहे.

Leave a Comment