Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतली आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे मात्र पावसाचा जोर हा खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
रिमझिम पावसामुळे फक्त पिके जिवंत राहू शकतात, मात्र जर जोरदार पाऊस पडला तर विहिरींना पाणी उतरेल आणि पुढील हंगामासाठी देखील पाणी उपलब्ध राहील. यामुळे रिमझिम पाऊस पडत असतानाही शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजर आहेत. चातकाप्रमाणे शेतकरी बांधव मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत.
परंतु मोठा पाऊस राज्यातून जणू काही गायबच झाला आहे. ऑगस्ट महिन्याचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आता या शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी कामाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस मान्सून साठी पोषक परिस्थिती तयार होत नाहीये. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता मात्र हा कमी दाबाचा पट्टा देखील वायव्य कडे सरकला आहे. यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होत असले तरीदेखील जोरदार पाऊस होत नाहीये.
काही भागात जरूर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वदूरच रिमझिम पाऊस पडतोय असे नाही तर काही मोजक्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अर्थातच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान कोरडेच आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. 24 जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार नाही असे सांगितले जात आहे. 25 जुलै नंतर मात्र महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असे हवामाने विभागाने नमूद केले आहे.