खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय 58 वर्षांवरून ‘इतके’ वर्ष होणार, गठीत समितीचा अहवाल काय सांगतो ? पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात.

खरंतर केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय गेल्या काही वर्षांपूर्वी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की देशातील एकूण 25 घटक राज्यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर त्यांच्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील हा निर्णय लागू व्हावा अशी मागणी आहे. महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर दोन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळावा म्हणून सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करावे ही मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे.

या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे. विविध संघटनांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला आहे. विविध नेत्यांनी देखील या संदर्भात विधिमंडळात तसेच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र असे असले तरी अद्याप शासनाकडून या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

अशातच एका मीडिया रिपोर्ट मध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय लवकरच 58 वर्षांवरून 60 वर्षे होणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सध्या राज्यभरात विविध विभागातील आणि विविध संवर्गातील अडीच लाख पदे रिक्त आहेत.

सरकार यावर्षी 50 हजार पदे भरणार आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणात पदभरती करूनही दोन लाखाच्या वर पदे रिक्त राहणार आहेत. तसेच शासनाला एकाच वेळी एवढ्या रिक्त पदांची भरती करणे अशक्य आहे. तसेच नवीन पदांची भरती करण्यापेक्षा सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे शासनासाठी फायदेशीर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष बाब म्हणजे शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर झाला असून यावर सरकार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. एका रिपोर्टमध्ये तर राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीसाठी एका समितीची स्थापना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच सदर स्थापित झालेल्या समितीने याबाबत आपला अहवाल देखील शासनाकडे सुपूर्द केला असल्याचे सदर रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत लवकरच शासनाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment