आईच्या संपत्तीवर/मालमत्तेवर मुला-मुलींचा अधिकार असतो का ? काय सांगतो कायदा ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rule : आपल्या देशात संपत्तीवरून कायमच मोठे वाद-विवाद पाहायला मिळाले आहेत. संपत्ती वरून परिवारात विशेषता भावंडांमध्ये मोठे वाद विवाद होतात. अनेकदा हे वादविवाद कोर्टात जातात. न्यायालय मग संपत्तीचे वाद मिटवते. मात्र संपत्तीवरून होणारे हे वाद आणि न्यायप्रविष्ट प्रकरण लवकर निकाली निघत नाही.

यामुळे संपत्ती वरून होणाऱ्या वादविवादात नागरिकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाया जातो. अनेकदा संपत्तीबाबत असलेल्या कायद्यासंदर्भात माहितीचा अभाव असणे देखील अनेक वादविवाद उपस्थित करते. अनेकांना मालमत्तेबाबत आणि त्यावरील हक्काबाबत योग्य माहिती नसते.

म्हणून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. खरंतर वडिलांच्या संपत्तीत परिवारातील प्रत्येक सदस्याचा हक्क असतो हे आपल्याला ठाऊकच आहे. मात्र आईच्या संपत्तीत मुला-मुलींचा काय अधिकार असतो किंवा आईच्या संपत्तीत मुलाला आणि मुलींना अधिकार असतो का? याबाबत आपल्यापैकी अनेक जण अनभिज्ञ असतील. अशा परिस्थितीत आज आपण या बहुमूल्य बाबी विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आईच्या संपत्तीवर मुला-मुलींचा अधिकार असतो का?

जर आईने काही मालमत्ता कमावलेली असेल किंवा तिच्या नावावर काही मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचा वारस देखील असणार हे उघड आहे. त्यामुळे आईच्या संपत्तीवर कोणाचा कितका अधिकार असतो हे माहिती असणे देखील आवश्यक आहे.

याबाबत भारतीय कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. यानुसार, जर एखाद्या आईने स्वतःच्या कमाईतून मालमत्ता कमावली असेल किंवा ती तिच्या पतीकडून, वडिलांकडून किंवा आईकडून वारसाहक्काने आईला प्राप्त झाली असेल तर मुलाचा किंवा मुलीचा त्यावर कोणताच अधिकार नसतो.

याचाच अर्थ जर आईची इच्छा असेल तर ती तिच्या मृत्यूपत्राद्वारे तिच्या नावावर असलेली मालमत्ता कोणालाही देऊ शकते. म्हणजे तिला हवे असेल तर ती मालमत्ता मृत्युपत्र बनवून मुलीला किंवा मुलाला देऊ शकते अन्यथा इतर व्यक्तीला ती मालमत्ता हस्तांतरित करू शकते.

पण जर आईचा मृत्यूपूर्वी इच्छापत्र तयार केलेले नसेल आणि तिचा मृत्यू झाला असेल तर हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार प्रथम श्रेणीतील लोकांना ती मालमत्ता मिळू शकते, असे भारतीय कायद्यात नमूद करण्यात आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रथम श्रेणीमध्ये कोणाचा समावेश होतो.

तर आम्ही सांगू इच्छितो की प्रथम श्रेणीमध्ये मुले आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश होतो. याचाच अर्थ जर मृत्युपत्र किंवा इच्छापत्र न बनवता आईचा मृत्यू झाला असेल तर सदर आईच्या मालमत्तेत मुला-मुलींचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा वाटा असतो किंवा हिस्सा असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे की, हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 नुसार, विवाहित मुलींना वडील आणि आई या दोघांच्या संपत्तीमध्ये वाटा असतो.

यामुळे जर आईचा मृत्यू इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र न बनवता झाला तर अशा प्रकरणांमध्ये 1956 च्या कायद्यानुसार वारसा हक्काचे कायदे लागू होतात. भारतीय कायद्यानुसार पती, मुलगा, मुलगी, मुलीची मुले आणि मुलाची मुले आईच्या मालमत्तेत हिस्सा मागू शकतात. म्हणजे आईच्या संपत्तीत परिवारातील या लोकांना हिस्सा मिळतो.

तसेच भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 च्या कलम 42 आणि 43 अन्वये, जर एखाद्या अविवाहित महिलेच्या नावावर मालमत्ता असेल आणि अशा अविवाहित महिलेचा मृत्युपत्र किंवा इच्छापत्र न बनवता मृत्यू झाला आणि तिचे वडील हयात असतील तर सदर अविवाहित महिलेची मालमत्ता ही कायद्याने वडिलांकडे हस्तांतरित केली जाईल.

पण जर वडीलही मरण पावले असतील तर सदर मरण पावलेल्या अविवाहित महिलेची मालमत्ता तिची आई आणि तिच्या भावंडांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.

एकंदरीत, आईच्या संपत्तीवर ती हयात असतांना कोणाचाच अधिकार नसतो. आई तिच्या नावावर असलेली संपत्ती तिची इच्छा असल्यास मृत्युपत्र बनवून कोणालाही देऊ शकते. पण जर मृत्युपत्र न बनवता आईचा मृत्यू झाला असेल तर अशी संपत्ती पती, मुलगा, मुलगी, मुलीची मुले आणि मुलाची मुले यांना मिळू शकते.

तसेच अविवाहित महिलेचा मृत्युपत्र न बनवता मृत्यू झाला असेल तर सदर अविवाहित महिलेच्या नावावर असलेली संपत्ती वडिलांच्या नावावर होणार आहे. तसेच जर सदर अविवाहित महिलेचे वडीलही हयात नसतील तर ती संपत्ती तिच्या आईला आणि भावंडांना सम प्रमाणात मिळणार आहे.

Leave a Comment