पड रे पाण्या….! आता महाराष्ट्रात पाऊस केव्हा परतणार ? हवामान विभागाने स्पष्टच सांगितल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला होता मात्र या ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे.

गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जेवढा खंड पडला नव्हता तेवढा खंड यंदा पाहायला मिळत आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. खरिपातील पिके आता पावसाअभावी करपू लागली आहेत.

यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत. विशेष म्हणजे राज्यातील बहुतांशी धरणे आता ऑगस्ट महिन्यात संपत चालला तरीही फुल भरलेली नाहीत. परिणामी येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य जनता देखील चिंतेत आहे. म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र आता पाऊस केव्हा कमबॅक करणार, जोरदार पावसाला केव्हा सुरुवात होणार हाच प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे.

उत्तर भारतात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून श्रावण सऱ्या बरसत आहेत. या श्रावण सऱ्या मात्र राज्यातील कोकणात आणि विदर्भातच पाहायला मिळत आहेत.

उर्वरित महाराष्ट्रात रिमझिम पाऊस देखील पडत नाहीये. अशातच आता पावसासंदर्भात आणखी एक अपडेट हाती आले आहे. भारतीय हवामान विभागाने या चालू ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याने ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देखील जोरदार पाऊस होईल अशी कोणतीच आशा दिसत नाही असे स्पष्ट केले आहे.

यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तरी जोरदार पाऊस होईल या आशेवर पुन्हा एकदा पाणी फेरले जाणार असे चित्र आहे. पण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. सात सप्टेंबर नंतर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

तूर्तास मात्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच या भागात आगामी काही दिवस ढगाळ हवामान राहणार असं हवामान तज्ञांनी सांगितल आहे. एकंदरीत सध्याच्या पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजाची चांगलीच कोंडी झाली आहे.

दरम्यान एक सप्टेंबर नंतर राजस्थान मधून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि याच दरम्यान बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होणार असा अंदाज आहे. यामुळे याचा परिणाम म्हणून एक सप्टेंबर नंतर पावसासाठी पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात होणार आहे.

आणि सात सप्टेंबर नंतर राज्यातील बहुतांशी भागात पाऊस जोर धरणार असा अंदाज आहे. एकंदरीत जोरदार पावसासाठी आता सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा जाऊ द्यावा लागणार आहे.

निश्चितच हा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. दरम्यान आता दीड महिना पावसाळा राहिला असून यापैकी दहा ते बारा दिवस राज्यात पावसाची शक्यताच नाहीये. केवळ तुरळक ठिकाणी हलक्या सऱ्या बरसणार असा अंदाज आहे.

Leave a Comment