पुणे ते मुंबईचा प्रवास होणार जलद; 6 किमीचे अंतर होणार कमी, मिसिंग लिंक प्रकल्प केव्हा सुरू होणार ? दादा भुसेंनी उद्घाटनाची तारीखच सांगितली 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mumbai Missing Link Project : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत आहे. खरंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे.

या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मुंबई ते पुणे दरम्यान प्रामुख्याने रस्ते मार्गाने प्रवास केला जातो. या प्रवासादरम्यान मात्र नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. दरम्यान हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागात पर्यायी रस्त्यासाठी बोगदा तयार केला जात आहे.

याला मिसिंग लिंक प्रोजेक्ट असे नाव देण्यात आले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत दोन बोगदे तयार केले जात असून यातील एक बोगदा 1.75 किलोमीटर लांबीचा तर दुसरा बोगदा ८.९३ किलोमीटर लांबीचा आहे. दरम्यान, या मिसिंग लिंक प्रोजेक्टची नुकतीच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे.

लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी भुसे यांनी केली असून यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास सुसाट होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हे अंतर 13 km ने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत तब्बल अर्धा तासाची बचत होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. भुसे यांनी यावेळी लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत तयार होत असलेल्या टनेलच्या कामाची पाहणी केली आहे. या टनेलचे काम आत्तापर्यंत 75 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे.

विशेष म्हणजे टनेलचे उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प नियोजित वेळेत प्रवाशांसाठी सुरू केला जाईल असे सांगितले जात आहे. या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत विकसित होत असलेले टनेल जगातील सर्वाधिक रुंदीचे म्हणजे 23.5 मीटर रुंदीचे टनेल आहे. तसेच हा रस्त्यावरील देशातील सर्वाधिक लांबीचा टनेल असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली आहे.

मुंबई ते पुण्याचा प्रवास होणार मात्र दीड ते अडीच तासात

भुसे यांनी सांगितले की, सध्या या एक्सप्रेस वे ने मुंबई ते पुणे हे अंतर दोन ते तीन तासात कव्हर होत आहे. मात्र, या प्रवासात या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे तब्बल अर्ध्या तासाची बचत होणार आहे. म्हणजेच मुंबई ते पुणे हे अंतर या प्रोजेक्टमुळे केवळ दीड ते अडीच तासात पूर्ण होणार आहे.

केव्हा पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प?

मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जगातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून पूर्ण केले जात आहे. या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जलद गतीने सुरू आहे. यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार आहे. भुसे यांनी 24 सप्टेंबर 2024 पर्यंत या प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण होणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

निश्चितच भुसे यांनी लोकार्पणाबाबत दिलेली ही अपडेट मुंबई आणि पुणेकरांसाठी विशेष आनंदाची राहणार आहे. मात्र आता भुसे यांनी सांगितलेल्या वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण होते का आणि हा प्रकल्प 24 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

Leave a Comment