ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! हुमणी अळीवर कसं नियंत्रण मिळवायचं ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Crop Management : राज्यात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती होते. खरंतर ऊसाला कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते.

याचे मुख्य कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी डोईजड होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी अतिरिक्त उसामुळे ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान गेल्या वर्षी उसाच्या उत्पादनात घट आली होती. यावर्षी सुद्धा उसाचे उत्पादन कमी होणार असा दावा केला जात आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे यंदा पावसाचे प्रमाण हे खूपच कमी आहे. कमी पाण्यामुळे उसाचे उत्पादन 100% कमी होणार असे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त सध्या ऊस पिकात हुमणी अळीचा देखील प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. ही अळी इतरही पिकांमध्ये आढळते मात्र ऊसात या अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो.

या आळीवर जर योग्य वेळी नियंत्रण मिळवले नाही तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि उत्पादनात घट येण्याची भीती असते. अशा स्थितीत आज आपण ऊस पिकात आढळणाऱ्या या अळीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय नुकसान करते

हुमणी अळी जमिनीच्या आत मध्ये असते. जमिनीच्या आत राहून ही अळी पिकांच्या मुळ्या करतडत राहते. या अळ्या पिकांच्या मुळावरच आपली उपजीविका भागवतात. यामुळे मात्र पिकांचे मोठे नुकसान होते. सुरुवातीला या अळीमुळे झाडे पिवळे पडतात. यानंतर मग झाड वाळू लागते.

कसं मिळवणार नियंत्रण?

या अळीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर पिकांमध्ये आंतरमशागत करण्याचा सल्ला दिला जातो. पिकात निंदणी केल्याने हुमणी अळी जमिनीवर येते. अळी जमिनीवर आली तर कडक उन्हामुळे आणि मरण पावते. किंवा मग अशा अळ्या पक्षी वेचून खातात. यामुळे या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंतरमशागत एक महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगितले जाते.

याव्यतिरिक्त काही तज्ञ लोक या आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी पिकाला फ्लड पाणी म्हणजे वाहते पाणी देण्याचा सल्ला देतात. वाहते पाणी देऊन काही काळ पाणी शेतात साचू द्यावे. असे केल्यास या अळ्या गुदमरून मरतात.

या व्यतिरिक्त कृषी तज्ञांनी या अळ्यांच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशी शेणखतात वापरण्याचा सल्ला दिला आहे. मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली ही बुरशी उभ्या पिकात देखील वापरली जाते.

उभ्या पिकात या बुरशीचा जर वापर करायचा असेल तर दहा किलो प्रती हेक्टर या प्रमाणात या बुरशीनाशकाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या जैविक बुरशीनाशकामुळे पिकावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही या उलट हुमणी अळी आजारी पडते आणि आजारी पडून ही अळी मरण पावते.

Leave a Comment