Maharashtra To Ayodhya Travel News : 22 जानेवारी 2024 हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री क्षेत्र अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन केले. 22 जानेवारीला क्षेत्र अयोध्या येथील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यानंतर हे मंदिर सर्वसामान्य राम भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
तेव्हापासून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. संपूर्ण देशातील आणि जगातील रामभक्त अयोध्याला हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे राम भक्तांसाठी देशभरातून रेल्वे चालवल्या जात आहेत. आपल्या महाराष्ट्रातून देखील आयोध्यासाठी रेल्वे गाड्या सुरू आहेत.
यामुळे भाविकांना जलद गतीने अयोध्येला पोहोचता येत आहे. सध्या स्थितीला महाराष्ट्रातून अयोध्याला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी जवळपास 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. पण, हा प्रवासाचा कालावधी आता अवघ्या साडेपाच तासांवर येणार आहे.
कारण की, आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथून एक नवीन विमान सेवा सुरू झाली आहे. काल अर्थातच एक एप्रिल 2024 पासून नाशिक येथून लखनऊसाठी इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने विमानसेवा सुरू झाली आहे.
परिणामी या विमानसेवेमुळे आता जलद गतीने श्रीक्षेत्र अयोध्याला जाता येईल अशी आशा आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासहित संपूर्ण राज्यातील रामभक्तांना जलद गतीने अयोध्याला जाता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ते नागपूर दरम्यान सुरू असलेल्या विमान सेवेचा विस्तार आता लखनऊ पर्यंत करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने घेतलेला आहे. त्यामुळे आता नागपूर येथे जाऊन विमान बदलण्याची गरज राहणार नाही.
म्हणजेच आता नाशिक येथून थेट लखनऊ पर्यंत त्याच विमानाने जाता येणार आहे आणि पुढे श्रीक्षेत्र अयोध्याला देखील जलद गतीने पोहोचता येणार आहे. दरम्यान आता आपण या विस्तारित करण्यात आलेल्या विमानसेवेचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक विमानतळावरून दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी विमान उड्डाण भरणार आहे हे विमान उपराजधानी नागपूरला सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. मग पुढे हे विमान लखनऊला रात्री सव्वा आठ वाजता लँड होणार आहे.
अर्थातच अवघ्या साडेपाच तासांमध्ये नाशिक येथून श्रीक्षेत्र अयोध्या येथे पोहोचता येणे शक्य होणार आहे. या ए विमानसेवेच्या तिकिटाबाबत बोलायचं झालं तर प्रवाशांकडून 3700 ते 4200 एवढे तिकीट यासाठी काढावे लागणार आहे.
दुसरीकडे, रेल्वेच्यासी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच रेल्वेच्या एसी बोगीच्या तिकिटापेक्षा विमानाचे तिकीट दुपटीने महाग आहे मात्र यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.