Maharashtra Turmeric Rate : राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतात. याशिवाय मराठवाड्यात देखील हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी हळद या नगदी पिकावर अवलंबून आहे.
या पिकावर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून असते. सध्या मात्र हळदीचे बाजारभाव कमी झाले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीला निश्चितच चांगला भाव मिळत होता. मात्र या चालू सप्टेंबर महिन्यात हळदीच्या बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
अवघ्या काही दिवसातच हळदीच्या बाजार भावात तब्बल 4,000 रुपयांपर्यंतची घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये पॅनिक वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका महिन्याच्या काळात चार हजाराची घसरण झाली असल्याने आगामी काही दिवसात हळदीच्या दरात आणखी घसरण होणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीचे बाजार भाव साडेसतरा हजार रुपयाच्या आसपास पोहचले होते. मात्र काल 11 सप्टेंबर 2023 रोजी हळदीला मात्र साडेबारा हजार रुपयाचा भाव मिळाला. म्हणजेच क्विंटलमागे चार ते पाच हजार रुपयाची घसरण झाली आहे.
यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हळदीच्या बाजार भावात येत्या काही दिवसात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर हळदीला विक्रमी भाव मिळणार असा दावा काही तज्ञांनी केला आहे.
विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात जेवढा भाव मिळाला त्यापेक्षा अधिक भाव गणेशोत्सवानंतर हळदीला प्राप्त होऊ शकतो असे मत काही शेतकऱ्यांकडून आणि कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता खरंच हळदीला एवढा विक्रमी भाव मिळणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
हिंगोली येथील मार्केटमध्ये जून मध्ये हळद मात्र सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकली जात होती. मात्र जुलै अखेर साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटल ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान हळदीला भाव मिळाला.
तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळदीचे भाव 17 हजार 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत. पण आता हळदीचे बाजार भाव रिव्हर्स झाले आहेत. 11 सप्टेंबरला हळदीला 11000 रुपये प्रति क्विंटल ते 12 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे.