Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिना उलटण्यास फक्त सात दिवसांचा काळ बाकी आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात थन्डीचा जोर वाढत नसल्याचे पाहायला मिळतं आहे. राज्यातील खानदेश मधील जळगावसह संपूर्ण खानदेशात मध्यँतरी कमाल आणि किमान तापमानात थोडीशी घट झाली होती.
शिवाय गुलाबी थंडीची चाहूल देखील लागली होती. पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमान पुन्हा वाढू लागले आहे.
कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ नमूद करण्यात आली असल्याने गुलाबी थंडीची चाहूल कुठे ना कुठे कमी झाली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांच्या माध्यमातून आता जोरदार थंडीला केव्हा सुरूवात होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशातच भारतीय हवामान हवामान विभागातील निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महाराष्ट्रातील पुढील आठ दिवसाच्या हवामाना संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी दिली आहे. माणिकराव खुळे यांनी महाराष्ट्रातील हवामानबाबतचा पुढील आठ दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता 27 नोव्हेंबर पर्यंत बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बरसणार आहे.
कुठे बरसणार मुसळधार पाऊस
Khule यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबरपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
तर या संबंधित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 26 नोव्हेंबरला राज्यात पावसाची तीव्रता अधिक वाढणार आहे.
26 तारखेला राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपतीसंभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्याच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. एकंदरीत ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
यामुळे आता खुळे यांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागून राहणार आहे. पण अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाची, शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा आणि पशुधनाला देखील सुरक्षित ठिकाणी बांधावे असा सल्ला जाणकार लोकांनी यावेळी दिला आहे.