पुणे वेधशाळेचा नवीन हवामान अंदाज आला रे..! राज्यात पुन्हा वरूणराजाची हजेरी लागणार, कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस ? वाचा सविस्तर 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. पुणे वेधशाळेने एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. वेधशाळेने महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे.

यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात मोठी घट पाहायला मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले आहे. जळगाव हे महाबळेश्वर पेक्षा थंड ठिकाण ठरले आहे. याशिवाय राज्यातील इतरही भागातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नेहमीपेक्षा थंडीची तीव्रता कमी राहणार असल्याचे सांगितले आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. अशातच आता पुणे वेधशाळेने पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडणार असा अंदाज वेधशाळेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. IMD ने सांगितले की, उत्तरेकडून येणारे थंड वारे आता कमी झाले आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातून आता बाष्पयुक्त वारे आपल्या राज्याच्या दिशेने येऊ लागले आहेत.

याचा परिणाम म्हणून राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे. ईशान्य मान्सूनमुळे भारतातील दक्षिण भागात जोरदार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील जाणवत आहे. आपल्या राज्यात या हवामान बदलामुळे पुढील तीन दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही भागात पाऊस देखील पडणार आहे.

कुठं पडणार पाऊस

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टी जवळ चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. हे वादळ कोकण किनारपट्टी जवळ आहे. यामुळे कोकणातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मात्र चक्रीवादळाचा जोर हा खूपच कमी असल्याने पावसाची तीव्रता देखील कमी राहणार आहे. म्हणजेच या भागात फक्त हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त राज्यातील इतरही भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरित भागात रात्रीच्या तापमानात म्हणजेच किमान तापमानात थोडीशी वाढ होणार आहे. पुण्याचा विचार केला असता आगामी 24 तास पुणे शहरात व जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment