Mahindra CNG Tractor : शेतीत आता काळाच्या ओघात बदल होऊ लागला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत थोडासा सोपा आणि फायदेशीर झाला आहे.
पूर्वी शेतीमध्ये जमिनीच्या पूर्व मशागतीपासून पीक पेरणीपर्यंत आणि पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंत सर्व कामांमध्ये बैलांचा आणि बैल जोडीचा वापर होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शेतीमध्ये बैलांचा वापर कमी झाला आहे.
शिवाय आता कमी मजूरात शेतीची कामे केली जात आहे. कारण की आता शेतीमध्ये नवनवीन यंत्रांचा समावेश झाला आहे. ट्रॅक्टर सारख्या आधुनिक यंत्राच्या वापरामुळे आता शेतीची कामे सोपी झाली आहेत.
ट्रॅक्टरमुळे शेतीच्या पूर्व मशागती पासून ते पिकाच्या काढणीपर्यंत सर्वच कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. यामुळे शेतकरी बांधव आता शेती कामांसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करू लागले आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर शेतकरी बांधव वापरत आहेत.
अशातच आता देशातील एका प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनीने सीएनजी वर चालणारे नवीन ट्रॅक्टर तयार केले आहे. खरे तर सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडे असणारे बहुतांशी ट्रॅक्टर हे डिझेलवर चालतात. पण आता सीएनजी गॅसवर चालणारे ट्रॅक्टर देखील तयार झाले आहे.
महिंद्रा या देशातील प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनीने हे ट्रॅक्टर बनवले आहे. या सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे जलद होणार आहेत शिवाय इंधन खर्चात मोठे बचत होणार आहे असा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे.
कसा आहे महिंद्रा कंपनीचा सीएनजी ट्रॅक्टर
महिंद्रा कंपनीने नुकताच आपला नवीन सीएनजी ट्रॅक्टर प्रदर्शित केला आहे. या ट्रॅक्टरची विशेषता म्हणजे हा ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच ताकदवान आहे. डिझेल चलित ट्रॅक्टर ज्या प्रमाणे शेतीची कामे करतो तशीच कामे हा देखील ट्रॅक्टर करणार आहे.
या ट्रॅक्टरमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी 45 लिटरच्या चार टाक्या देण्यात आले आहेत. या चार टाक्यांमध्ये जवळपास 24 किलो एवढा गॅस भरला जाऊ शकतो. कंपनीच्या मते सीएनजी ट्रॅक्टरला इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत प्रति तास शंभर रुपये कमी इंधन खर्च लागणार आहे.
तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन अधिक मजबूत राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशात मोठी बचत होण्याची शक्यता आहे. हा ट्रॅक्टर प्रदूषण कमी करणार आहे. एकंदरीत हा नवीन सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान कंपनीकडून हा ट्रॅक्टर बाजारात आणण्यासाठी सर्व आवश्यक तयारी सुरू झाली आहे. यामुळे लवकरच हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.