खुशखबर….! महाराष्ट्र राज्य सरकार मुलींच्या जन्मानंतर देणार 50 हजार रुपये, ‘या’ अटी पूर्ण कराव्या लागणार, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra : स्त्री भ्रूण हत्या ही समस्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आजही कायमच आहे. आजही केवळ मुलीचा गर्भ म्हणून गर्भपात केला जातो. मुलींना आजही आपल्या समाजात ओझे समजले जाते. मुलगीला जबाबदारीचे ओझे समजतात.

मुलगी जन्माला आली म्हणजे तिच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागेल, तिच्या लग्नात हूंड्यासाठी मोठा पैसा द्यावा लागेल अशी एक ना अनेक शुल्लक कारणे पुढे करून मुलींचे गर्भपात केले जाते. काही तर मुली वंश पुढे चालवत नाही तर मुलगा वंश पुढे चालवतो असे सांगत मुलीचा गर्भपात करतात.

निश्चितच, ज्या महाराष्ट्राच्या भूमीत थोर महापुरुषांनी जन्म घेतला त्या पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील अशी संकुचित बुद्धिमत्ता असलेली लोक वावरत आहेत. जी की महाराष्ट्रासाठी आणि आपल्यासाठी एक लज्जास्पद बाब आहे. दरम्यान शासनाकडून स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मुलींना देखील मुलांप्रमाणेच समाजात स्थान मिळावे यासाठी शासन झगडत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. मुलगी ही आई-वडिलांना ओझे वाटू नये यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे. स्त्री भ्रूण हत्येवर अंकुश लावण्यासाठी, मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.

या माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 50 हजार रुपये दिले जात आहेत. आज आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनेच्या लाभासाठी आई आणि मुलीचे जॉइंट अकाउंट लागते. अकाउंट ओपन केल्यानंतर एक लाख रुपयाचा विमा आणि पाच हजार रुपयांचा ओव्हरट्राफ्ट दिला जातो.

या योजनेअंतर्गत ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी केली आहे अशा पालकांना पन्नास हजाराचा लाभ दिला जातो. ही रक्कम मुलीच्या नावावर जमा होते. तसेच जर दोन मुलीच्या जन्मानंतर नसबंदी केली तर प्रत्येक मुलीच्या खात्यावर 25-25 हजार रुपयाची रक्कम जमा होते.

कोण-कोणती कागदपत्रे लागतात?

ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभासाठी काही कागदपत्रांची गरज असते. यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, निवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना करावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी सर्वप्रथम आपणास माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल. हा अर्ज आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करू शकता.

अर्ज डाऊनलोड केल्यानंतर या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि हा अर्ज काळजीपूर्वक भरा. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही, खाडाखोड होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे. अर्ज भरल्यानंतर या अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा. यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे महिला आणि बालविकास मंत्रालयात जमा करावा लागणार आहे.

Leave a Comment