15 ऑगस्टपर्यंत कांदा अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! किती शेतकरी ठरलेत पात्र, किती रक्कम मिळणार ? वाचा संपूर्ण आकडेवारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Subsidy Maharashtra : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पण गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणेच याही अधिवेशनात कांद्याचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. खरंतर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले.

राज्य शासनाने 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादेत राज्यातील कांदा उत्पादकांना देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तसेच विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

दिले जाणारे अनुदान हे जरी तोकडे असले तरी देखील यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागेल, संपूर्ण नुकसानीची भरपाई होणार नाही मात्र थोड्याफार प्रमाणात का होईना यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात होता. मात्र नेहमीप्रमाणेच सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी गत कांदा अनुदानाबाबत झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या या घोषणेची प्रतिपूर्ती पावसाळी अधिवेशन आले तरी देखील होऊ शकलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. अशातच मात्र शासनाकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

शासनाने 15 ऑगस्टपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असे महत्त्वाचे विधान दिले आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी 15 ऑगस्ट पर्यंत कांदा अनुदानाचा पैसा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती दिली आहे.

निश्चितच, यामुळे राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडासा हातभार लागण्यास मदत होणार आहे. दरम्यान आज आपण कांदा अनुदानासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र ठरले आहेत आणि यासाठी किती रक्कम शासनाने मंजूर केली आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

कांदा अनुदानाची सद्यस्थिती

हाती आलेल्या माहितीनुसार, कांदा अनुदानासाठी राज्यातील तीन लाख 2 हजार 444 शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी 755 कोटी 64 लाख रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात कांदा अनुदानासाठी केवळ 550 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे.

यामुळे आणखी 200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी सरकारला सादर करावी लागणार आहे. यानंतर मग यासंबंधीत शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदा अनुदान वितरित करण्यासाठी पणन विभागाकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार आहे. मग आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून अनुदानाची संपूर्ण रक्कम 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना वितरीत होणार आहे.

Leave a Comment