आताची सर्वात मोठी बातमी ! पीएम किसान योजनेच्या 14 व्या हफ्त्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी मिळणार 14वा हफ्ता, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana News : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार ? अशातच गेल्या तीन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने या योजनेच्या आगामी हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली होती.

केंद्र शासनाने पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा आगामी चौदावा हप्ता हा 28 जुलै 2023 रोजी, शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होता. मात्र आता हप्त्याची तारीख बदलण्यात आली आहे. आता 28 जुलैला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. याबाबत सरकारने माहिती दिली आहे. दरम्यान आज आपण 14 वा हफ्ता केव्हा मिळणार? याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता केव्हा मिळाला ?

पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची मदत दिली जाते. एका वर्षात 2-2 हजाराचे तीन हफ्ते दिले जातात. आत्तापर्यंत 13 दोन हजार रुपयाचे हफ्ते देण्यात आले आहेत. तेरावा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळाला होता. 27 फेब्रुवारीला तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.

वास्तविक या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. यामुळे तेरावा हप्ता जमा होऊन चार महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला असल्याने शेतकऱ्यांना 14 व्या हफ्त्याची आतुरता लागून आहे. दरम्यान चौदाव्या हफ्त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आली होती. केंद्र शासनाने 28 जुलैला 14 वा हप्ता दिला जाणार असे डिक्लेअर केलं होतं. आता मात्र यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.

केव्हा मिळणार 14 वा हफ्ता ?

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा चौदावा हप्ता हा 27 जुलैला मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीच्या नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधीच या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील सीकर येथे एका शेतकरी कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता देशभरातील साडेआठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. अर्थातच 14 वा हप्ता एक दिवस आधीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment