Maruti Suzuki Uocoming Car : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विकणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत यात शंकाच नाही. कंपनीचा पोर्टफोलिओ खूपच चांगला आहे. कंपनीकडे वेगवेगळ्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीने अजूनही छाप सोडलेली नाही.
भारतीय कार बाजाराचा विचार केला असता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा कंपनीचा सर्वात जास्त वाटा पाहायाला मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सची हिस्सेदारीं 75 टक्के एवढी आहे. आता मात्र मारुती सुझुकी इलेक्ट्रिक सेगमेंट मधील आपले पहिली कार लॉन्च करणार असे वृत्त विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहेत.
एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्ट मधून हाती आलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार 2024 अखेरपर्यंत लॉन्च करणार आहे. याशिवाय कंपनी आणखी एक कार एप्रिल-मे 2024 च्या आसपास लाँच होणार अशी माहिती समोर येत आहे. म्हणजेच येत्या काही महिन्यात मारुती सुझुकी दोन नवीन कार लॉन्च करणार असून यापैकी एक कार इलेक्ट्रिक राहणार आहे. आता आपण या दोन्ही गाड्यांची माहिती पाहणार आहोत.
मारुती सुझुकी eVX इलेक्ट्रिक SUV : मारुती सुझुकी लवकरच इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार अशी माहिती समोर येत आहे. कंपनी 2024 च्या अखेरीस आपली पहिली इलेक्ट्रिक कार eVX इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. भारतात चाचणी दरम्यान ही कार अनेक वेळा पाहिली गेली आहे.
या आगामी कारमध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय असेल जो 48 आणि 60 kWh बॅटरीसह सुसज्ज असेल. ते अनुक्रमे 400 किलोमीटर ते 550 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते. निश्चितच मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी ही बातमी कास राहणार आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर : मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. ही नवीन Swift एप्रिल-मे 2024 च्या सुमारास भारतात विक्रीसाठी लॉन्च होईल अशी आशा आहे. तसेच कंपनी लोकप्रिय सेडान डिझायरची सुद्धा नवीन आवृत्ती लॉन्च करणार असल्याचा दावा कंपनीने आहे. दोन्ही कारच्या बाह्य आणि आतील भागात मोठे बदल होणार आहेत. यामुळे जर तुम्ही ही Swift आणि Dzire चे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.