Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे मोठ्या शहरात सर्वसामान्यांना घर घेणे आव्हानात्मक झाले आहे. प्रत्येकजण आपल्या घराच्या स्वप्नांसाठी लढत असतो. आपले एक हक्काचे घर असावे जिथे आपल्या परिवारासमवेत आनंदात राहता येईल अशी इच्छा प्रत्येकाची असते.
यापैकी काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर आजही असे अनेकजण असतील जे हक्काच्या घरासाठी अहोरात्र मेहनत घेत असतील. मात्र वाढत्या महागाईमुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे खूपच अवघड होत आहे.
घरांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध होणारे स्वस्तातील घर खरेदी करतात. यासाठी म्हाडाच्या लॉटरीची नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान म्हाडा कोकण मंडळाने 5311 घरांसाठी गेल्यावर्षी सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी जवळपास 24 हजाराहून अधिक नागरिकांनी अनामत रक्कमेसह अर्ज भरलेला आहे.
आता या नागरिकांना कोकण मंडळाची ही सोडत केव्हा निघणार याची आतुरता लागलेली आहे.अर्जदार या घरांसाठीच्या संगणकीय सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र मंडळाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे.
याची सोडत केव्हा निघणार याबाबत मंडळाकडून अजूनही अधिकृत रित्या माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण मंडळाच्या या घरांसाठी सोडत काढण्याचा प्लॅन म्हाडाने आखला आहे.
यासाठी मंडळाकडून मुख्यमंत्री महोदय यांचा वेळ मागितला जात आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही सोडत लांबत चालली आहे. अशातच आता या सोडतीसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर आहेत. येथून परतल्यानंतर 22 जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आणि त्यानंतर 26 जानेवारीला अर्थातच प्रजासत्ताक दिनाला मुख्यमंत्री महोदय वेळ देणार आहेत.
यामुळे 26 जानेवारी पर्यंत तरी ही सोडत निघणार नाही हे स्पष्ट होत आहे. यामुळे आता या महिन्याच्या अखेरीस सोडत निघणार की पुढल्या महिन्यात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
अर्जदारांच्या माध्यमातून ही सोडत लवकरात लवकर निघाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यामुळे आता म्हाडा मंडळ या सोडतीबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.