मोदी सरकारच महिलांना मोठ गिफ्ट ! गॅस सिलेंडर स्वस्त केल्यानंतर आता उज्वला योजनेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, काय फायदा होणार ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi Government Scheme : सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या इलेक्शनचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. शासनाकडून सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. विविध निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत.

खरंतर येत्या वर्षात लोकसभा निवडणुका तर आहेतच शिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या काही महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील नगाडा वाजणार आहे. दरम्यान महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला सर्वत्र घेरले जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता परेशान आहे. तज्ञ लोकांनी महागाईचा मुद्दा येत्या इलेक्शन मध्ये वरचढ ठरू शकतो असे सांगितले आहे.

हेच कारण आहे की, महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या आहेत. उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे ज्या महिला उज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना दोनशे रुपयांची सबसिडी तर मिळणारच आहे शिवाय गॅस देखील दोनशे रुपये स्वस्त मिळणार आहे.

एकंदरीत केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन देशभरातील महिलांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच देशातील गरीब आणि गरजू महिलांसाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे हा देखील निर्णय उज्वला योजनेबाबतच असून या निर्णयामुळे देशभरातील करोडो महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सरकारने देशातील 33 कोटी ग्राहकांच्या एलपीजीच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केले आहेत.

या 33 कोटी ग्राहकांना आता दोनशे रुपये गॅसची सबसिडी आणि दोनशे रुपये गॅसच्या किमतीत सवलत मिळत आहे म्हणजेच या ग्राहकांना तब्बल 400 रुपये स्वस्तात गॅस मिळत आहे. अशातच आज उज्वला योजनेअंतर्गत महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी अनुदान जारी करण्यास केंद्रातील मोदी सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यामुळे आता उज्वला योजनेअंतर्गत देशातील महिलांना नवीन एलपीजी कलेक्शन मिळणार आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तब्बल 1650 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अंतर्गत 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. अर्थातच या निर्णयाचा देशभरातील 75 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.

Leave a Comment