Monsoon 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यंदा अर्थातच मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभाग व्यतिरिक्त अनेक जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी देखील यंदा भारतासहित दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यावर्षी आपल्या महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज समोर येत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाला होता यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या आनंदात आहेत.
यंदाचा मान्सून हा चांगला राहणार असा अंदाज समोर आला असल्याने शेतकरी बांधवांनी आगामी खरीप हंगामासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. सध्या शेतकरी बांधव खरीपातील पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत करत आहेत.
बी बियाणे खरेदीसाठी देखील शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. भांडवलासाठी पैसे जमवले जात आहेत. आपल्या परिवारासमवेत शेतकऱ्यांची शेती-शिवारात लगबग वाढली आहे. अशातच मान्सून 2024 संदर्भात आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे.
हवामान तज्ञांनी यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हिंदी महासागरावर हवेचा दाब वाढत आहे. हेच कारण आहे की, आता मोसमी वारे वाहणार आहेत.
वारे आता दक्षिणेकडील जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडील कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात होणार आहे. सध्या आपल्या कोकणात वारे नैर्ऋत्येकडून वाहण्यास सुरुवात देखील झाली आहे. मान्सूनच्या उगमस्थानापासून चक्राकार वारे वाहू लागले आहेत.
विशेष म्हणजे या वाऱ्यांचा ताशी वेग देखील कमालीचा वाढत आहे. जे की मान्सून आगमनासाठी अनुकूल आहे. हवामानात होत असलेल्या या डेव्हलपमेंट मुळे मान्सून लवकर येऊ शकतो अशी शक्यता तयार होत आहे.
हवेत बाष्पाचे प्रमाणही वाढू लागले आहे. यावरून हवामान तज्ञांनी मॉन्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
या साऱ्या घडामोडी मान्सून लवकर येण्यासाठी पूरक असून दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा २ ते ३ दिवस आधीच होणार आहे. यंदा अंदमानात १७ किंवा १८ मे ला मान्सून येऊ शकतो अशी शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.