MPSC Recruitment 2023 : एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, एमपीएससी परीक्षेसाठी राज्यात लाखो विद्यार्थी तयारी करतात.
दरम्यान एमपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ग्रुप सी पदाच्या 7510 रिक्त जागांसाठी मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तविक या ग्रुप सी च्या भरतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांकडून विचारणा केली जात होती.
अखेरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही भरती जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे. तरुणांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप सी पदाच्या रिक्त जागांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित केली आहे.
तसेच यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण ग्रुप सी च्या या मेगा भरती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
1)दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 2) तांत्रिक सहाय्यक 3) कर सहाय्यक 4) लिपिक टंकलेखक या ग्रुप सी पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग या पदाच्या 6, तांत्रिक सहाय्यक पदाची 1, कर सहाय्यक पदाच्या 468, लिपिक टंकलेखक या पदाच्या 7 हजार 35 अशा एकूण 7510 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग आणि तांत्रिक सहाय्यक या दोन्ही पदासाठी पदवी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक या पदासाठी पदवीधर + मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनट उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत.
वयोमर्यादा
या पदांसाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार पाच वर्षांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.
परीक्षा शुल्क किती लागेल
या भरतीसाठी ओपन कॅटेगरी मधील उमेदवारांना 544 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
पगार किती मिळणार बरं?
या पदभरती अंतर्गत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना 32000 ते 101600 रुपये प्रति महिना, तांत्रिक सहाय्यक पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना 29,200 ते 92300 रुपये प्रति महिना, कर सहाय्यक पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना आणि लिपिक-टंकलेखक या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना 19200 ते 63200 रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे. तसेच नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील नियुक्त उमेदवार यांना दिले जाणार आहेत.
अर्ज केव्हा करता येणार
या भरतीसाठी 17 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
31 ऑक्टोबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मुदत उलटल्यानंतर अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
निवड कशी होणार
सुरुवातीला पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षेत ज्या उमेदवारांचे मिरीट मध्ये नावे त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसवले जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदासाठी नियुक्त केले जाईल.
मुख्य परीक्षा केव्हा होणार
17 डिसेंबर 2023 ला या भरतीची मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
जाहिरात कुठं पाहणार
एमपीएससी अंतर्गत निघालेल्या या ग्रुप सी च्या भरतीची जाहिरात https://acrobat.adobe.com/link/track?uri=urn:aaid:scds:US:68f2d522-c647-3f48-be0d-efefa0602ecf या लिंकवर पाहता येणार आहे.