Mumbai High Court Property Rights : मुंबई हायकोर्टाने संपत्तीच्या एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. खरे तर संपत्तीचे दोन प्रकार पडतात. एक संपत्ती असते वडिलोपार्जित आणि एक असते स्वअर्जित. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते.
दरम्यान, बॉम्बे हायकोर्टाने कोणती संपत्ती वडीलोपार्जित समजली जाणार नाही याबाबत एका प्रकरणात मोठा निकाल दिला आहे. आज आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
बॉम्बे हायकोर्टाने एका महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी दरम्यान निकाल देताना असे म्हटले आहे की, वडिलांनी मुलाला भेट म्हणून दिलेली स्व-अधिग्रहित मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता मानली जाणार नाही.
भाऊ आणि बहिणीच्या संपत्तीच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. डॉक्टर वडिलांच्या निधनानंतर भावा-बहिणीमध्ये मालमत्तेवरून वाद झाला.
मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्या बहिणींची अंतरिम याचिका अंशत: मान्य करताना, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भाई (७१) यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय सदनिका विकू नये किंवा तृतीय पक्षाचे हक्क निर्माण करू नयेत, असे आदेश दिले आहेत.
या फ्लॅटमध्ये डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. हा फ्लॅट संयुक्त कुटुंब निधीतून आणि पालकांनी घेतलेल्या कर्जातून खरेदी केल्याचा आरोप बहिणींनी केला आहे.
दोन्ही बहिणींनी गेल्या वर्षी भाऊ आणि त्याच्या मुलाविरुद्ध खटला दाखल केला होता. त्याचे वडील 2006 मध्ये आणि आई 2019 मध्ये मरण पावले.
वडिलांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात मालमत्ता घेतली होती. बहिणीने भावावर वडिलांचे तीन फ्लॅट गुपचूप आपल्या नावावर करून घेतलेत आणि अवघ्या एका वर्षाच्या काळात हे फ्लॅट विक्री केलेत असा आरोप केला आहे.
तसेच त्यांनीही प्रॉपर्टी जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणून घोषित करावे अशी मागणी देखील केली. मात्र न्यायालयाने बहिणीची अंतरीम याचिका अंशतः मान्य केली आहे.
माननीय न्यायालयाने भावाला न्यायालयाच्या परवानगीशिवाय सदनिका विकू नये किंवा तृतीय पक्षाचे हक्क निर्माण करू नयेत, असे आदेश दिले आहेत. पण अशी प्रॉपर्टी ही वडीलोपार्जित होऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.