Mumbai Jalna Vande Bharat Express : राजधानी मुंबई ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. खरे तर जालना सहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक रोजच कामानिमित्त मुंबईला येत असतात. शिवाय मुंबईहून जालनाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे.
अशा परिस्थितीत या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची होती. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.मुबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस ला 30 डिसेंबर 2023 रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे आता या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात काही महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार तसेच या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळू शकतो याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई ते जालना ही वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार आहे. या गाडीला या मार्गावरील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.
ही वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर, नासिक, मनमाड आणि ठाणे या चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. निश्चितच या रेल्वे स्टेशनंवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या गाडीचा फायदा मिळणार आहे.
कस राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावणार आहे. दरम्यान, गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेनिंग झालं नाही तुला सकाळी पाच वाजून 5 मिनिटांनी रवाना होईल आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अकरा वाजून 55 मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन मुंबई येथून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघेल आणि जालना येथे रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे.
महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस धावताय ?
महाराष्ट्रात सध्या सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यापैकी चार वंदे भारत एक्सप्रेस राजधानी मुंबईवरून धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या सहा मार्गावर ही गाडी धावत आहे.