Mumbai Metro News : मुंबई महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. या शहरात लोकसंख्येची घनता ही खूपच अधिक आहे. परिणामी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्याच्या लोकसंख्येसाठी अपुरी पडत आहे.
त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरात आणि उपनगरात विविध मार्गांवर मेट्रो चालवल्या जात आहेत. आतापर्यंत शहरातील आणि उपनगरातील बहुतांशी मार्गांवर मेट्रो सुरु झाली असून काही मार्गांवर मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत.
दरम्यान मुंबईकरांसाठी मेट्रोबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई शहराला लवकरच एका नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये शहरातील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरे ते कफ परेड या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मेट्रोमार्गाअंतर्गत 33 किलोमीटर लांबीची मार्गीका तयार केली जात आहे. या अंतर्गत पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारा मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 27 मेट्रोस्थानके तयार केले जात असून यापैकी 26 स्थानक भूमिगत आहेत आणि एक स्थानक जमिनीवर आहे.
दरम्यान या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा 16 किलोमीटरचा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. यासाठी सध्या या मेट्रो मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी नऊ मेट्रो गाड्या लागणार आहेत. यापैकी आठ गाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत.
येत्या काही दिवसात राहिलेली एक गाडी देखील मुंबईमध्ये पोहोचणार आहे. आरे येथे या मार्गाचे कारशेड उभारले जात आहे. खरंतर हा मेट्रो मार्ग 95 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाडी चालवण्यास सक्षम आहे. पण प्रत्यक्षात गाडी 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार आहे.
या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानके राहणार आहेत. याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर पर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात नियोजित वेळेत मेट्रो धावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.