Mumbai Mhada News : उंच गगनचुंबी इमारती अन गजबजलेल शहर म्हणून मुंबईला ओळखल जात. शिवाय मुंबई ही भारतातील सर्वात महागडे शहर आहे. येथे घरांच्या किमती देखील या शहरातील इमारतीप्रमाणेच गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घराच्या किमती सातत्याने वाढत असल्याने मुंबईमध्ये घर घेणे सर्वसामान्यांना परवडेनासे झाले आहे.
अशा परिस्थितीत म्हाडाची घरे सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांमुळे अनेकांचे गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान मुंबई मंडळाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे येत्या काही महिन्यात म्हाडा मुंबई मंडळ 2000 घरांसाठी लॉटरी काढणार असे रक्त समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये मुंबई मंडळ 2024 मधील पहिली लॉटरी जाहीर करणार आहे.
सप्टेंबर मध्ये घरांसाठी जाहिरात निघेल आणि तेव्हापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही मुंबईमध्ये परवडणाऱ्या घरांच्या शोधात असाल तर तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे.
कोणत्या घरांसाठी सोडत काढणार ?
मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात म्हाडा मुंबई मंडळ 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात गोरेगाव मधील सुमारे 332 घरांचा समावेश राहणार असा अंदाज आहे. ही उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
यातील मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती 80 लाखाच्या आसपास असतील आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती सव्वा कोटीच्या आसपास राहू शकतात असा अंदाज आहे. मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यात विविध गृह प्रकल्पातील 2000 घरांची कामे पूर्ण होणार आहेत.
गोरेगाव येथील घरांची कामे देखील 80 टक्के पूर्ण झाली आहेत आणि उर्वरित 20 टक्के काम देखील जलद गतीने सुरू आहे. विशेष बाब अशी की या लॉटरीमध्ये गेल्या सोडतीत जी घरे विकली गेली नाहीत त्यांचाही समावेश होऊ शकतो असा अंदाज आहे.
निश्चितच मुंबईमध्ये घर येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक गोड बातमी राहणार आहे. जर तुम्हीही म्हाडाच्या मुंबईमधील घरांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आत्तापासूनच यासाठी पैशांची अड्जस्टमेंट करून ठेवावी लागणार आहे.