Mumbai Nagpur Bullet Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि राज्याची उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांमधील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर मुंबई ते नागपूर रोजाना हजारो नागरिक प्रवास करतात. अशा स्थितीत या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. या मार्गाचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे. हा मार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2022 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी पूर्ण करण्यात आला आणि पीएम मोदी यांच्या हस्ते हा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला.

Advertisement

यानंतर शिर्डी ते भरवीर दरम्यानचा टप्पा पूर्ण करण्यात आला असून हा देखील मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. नागपूर ते शिर्डी हे 520 km चे अंतर आणि शिर्डी ते भरविर हे 80 किलोमीटरचे अंतर असा एकूण 600 km चा समृद्धी महामार्ग सध्या सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

विशेष बाब म्हणजे या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षी पर्यंत या मार्गाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार असून हा मार्ग लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केला जाणार आहे. आता या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून अशातच मुंबई आणि नागपूरकरांच्या सोयीसाठी लवकरच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असे चित्र तयार होत आहे.

Advertisement

वास्तविक, समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रकल्प अंतर्गत 741 किलोमीटर लांबीचा उन्नत रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला आहे. विशेष म्हणजे हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर देखील झाला आहे.

सध्या रेल्वे बोर्ड या डीपीआरचा सविस्तर अभ्यास करत असून यानंतर हा डीपीआर केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी याबाबत एबीपी माझा या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. अशा स्थितीत आज आपण मुंबई ते नागपूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या या बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसा असणार हा प्रकल्प

मुंबई ते नागपूर दरम्यान 742 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट समृद्धी महामार्गाच्या पॅरालल म्हणजेच समांतर राहणार आहे. यामुळे यासाठी खूपच कमी प्रमाणात जमिन संपादित करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी फक्त 1250 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

Advertisement

हा मार्ग राज्यातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाणार आहे. सध्या मुंबई ते नागपूर हा प्रवास करण्यासाठी जवळपास 14 ते 15 तासांचा कालावधी लागतो. पण बुलेट ट्रेन सुरू झाल्यास हा प्रवास मात्र साडेतीन तासात पूर्ण होणार आहे. या मार्गावरील बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर राहणार आहे. मात्र प्रत्यक्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार असे सांगितले जात आहे.

या प्रकल्पासाठी जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव 2019 मध्ये ठेवण्यात आला होता आणि 2021 मध्ये याचा डीपीआर तयार करण्यास सुरुवात झाली. 2022 मध्ये यासाठीचा DPR तयार झाला आणि हा डीपीआर रेल्वे बोर्डकडे पाठवण्यात आला आहे. सध्या रेल्वे बोर्ड या डीपीआरचा अभ्यास करत असून यानंतर रेल्वे बोर्ड हा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवणार आहे.

Advertisement

कोणत्या शहरातून धावणार बुलेट ट्रेन

ही बुलेट ट्रेन वर्धा, खापरी डेपो, पुलगाव, मालेगाव जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, इगतपुरी आणि शहापूर या महत्त्वाच्या शहरांमधून धावणार आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण पंधरा स्थानके राहणार आहेत.

Advertisement

यात मुंबई, ठाणे, शहपूर, घोटी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी, अजनी या स्थानकाचा समावेश राहणार आहे. हा बुलेट ट्रेन प्रकल्प राज्यातील एकूण दहा जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आला असला तरी याचा राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट मिळणार असा दावा केला जात आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *